दोस्तहो सर्वप्रथम नमस्कार... मी मालतेश... आमच्या 'सह्यात्री' टोळीतला एक सहयात्री म्हणून का होईना मित्रवर्य राकेश ने मला या एका blog च्या पानाची कमान आता माझ्या हाती दिलीय.. आत्ताच सांगता यायच नाय पण ही आमची भटकंती रॉनी च्या ईतर आधीच्या भागातील blog प्रमाणेच तुमच्या पुढ्यात टाकु शकेन का ते ज़रा doubtfull च आहे....? याची ठळक कारणं अशी की एकतर माझ्या शाळेला माझ्यातुन सुटून आता जवळपास २० वर्षे होतील आणि त्यात मी कधी मराठी विषयाच्या निबंधाच्या पलीकडे अस कधी काही लिहिलच नाही... आणि दुसर म्हणजे आमची ही असली '#उनाड भटकंती' झाली ती नोव्हेंबर २०१८ च्या दिवाळीत आणि हा बाबा मला...... 'तू पण लिहायला घे' म्हणालाय ते गेल्या २०१९ च्या उन्हाळाच्या तोंडावर आणि मला तेच साठवलेलं आठवता आठवता आलाय हा आत्ताचा २०२० चा लॉक डाउन चा उन्हाळा .... कस काय करायच... कस आठवायच नी काय काय लिवत/typing करत बसायच ते पण त्याच आमच्या ट्रेकवर... आणि त्यात आता त्यामागुन माझे कित्त्तीतरी ट्रेक उरकलेत सुद्धा ...!! अशी कयीक कारण देउनपण या राक्या च्या हेक्या पुढे माझं कधी चालत च नाय ना ... .. तर असो... कधीकाळी माझ्या सुचलेल्या ओळीतलेच... "लिहिणे आता भाग आहे....... आणि निरंतर चालणेही आता भाग आहे..."अशे काहीसे शब्द होते तेच डोळ्यापुढे आठवले ... Olympic मधल्या एखाद्या थकलेल्या खेळाडुने दुसर्या आपल्या साथीदाराच्या हाती जशी धगधगत्या मशालीची धुरा सोपवावी ना ..... एकदम आता तसच वाटतय..... तितक्याच जबाबदारीवर हा दिलेला धनुष्य उचलून हा भाग मांडण्याचा माझासुद्धा हा एकुलता एक प्रयत्न..... आपण दोस्तानीं संभाळून... समजुन घ्याव...नि प्रतिकिया नक्की द्यावी हीच एक विनंती वजा इच्छा !!
अहिवंत गडावरून आता साधारणपणे सकाळी १०.३० - ११ च्या सुमारास खिंडीतून उतरून आमचा मोर्चा मोहनदरी या गावाकडे कडे वळवायचा होता ...एव्हाना आम्ही खाल्लेल्या अंडा सॅन्डविचच्या भत्त्याचा पत्ता उन्हाच्या तडाख्यातच गायब होत चाललेला...
आजच्या आज मोहनदर किल्ला उरकून घेतला तर मला माझा पुढचा प्लान मांडायला बर पडणार होत.... मुळात माझ्याकड तसा प्लान तसा शिल्लक नव्हता पण तरी पण मनात मात्र "घर से ईत्ती दूर ट्रेक के लिये ही आयेछ है तो कहीं न कहीं चढ के जायेंगेच् ना " मनातली ती नुसतीच खाजेची बड़बड़..... पण आजचा दिवस लवकर संपवून उद्याच काय ते पन बघायच होत याच्यातच गड उतरत होतो.....

हायवेला आता सप्तशृंगी चा गड़ उजव्या बाजुला तर डाव्या बाजूने अर्ध वर्तुळाकार अशी ऊभी कातळभिंत असा दुरवर पसरलेला आणि त्यात त्या भिंतीला पडलेल ते सुंदर भगदाड !! खरतर कित्येक दिवसांपासून माझ्या लिस्ट मधल्या लक्षात ठेवला गेलेला तो मोहनदर ऊर्फ शिडका किल्ला !.. शिडका हे नाव तरी कस पडल असेल ते माहीत नाही पण पायथ्याशी असलेल्या 'मोहनदरी' गावामुळे 'मोहनदर' हे नाव एक नक्की असाव हे निश्चितच....
अहिवंतगडाच्या दरेगावातून एका शार्टकट ने जेमतेम ६-८ की.मी. आणि सप्तश्रृंगीगड़ा पासून १३ की.मी. अंतरावरचा तर हा मोहनदर किल्ला .... आम्ही उतरलेल्या अहिवंतगडाच्या खिंडीतून जो समोरचा एक डोंगर दिसत होता त्याच्या पलिकड़ेलाच तर मोहनदर लपलेला होता (तिथुनच खरंतर एखादी वाट नक्कीच असावी).
गाडी चालवताना माझ्या डोक्यात आता परत सगळी गणितं चालु झालेली.... आपल्या कड़ शिल्लक किराणा किती...., कोरडा खाऊ काय राहिलाय ? (आणि महत्वाच म्हणजे आमची ऊर्जा अजुन किती... ? ) दुपारच कुठे ... कस भागवायचं ... ? मोहनदर वर मुक्काम तर आजचा करायचा नाय...... नाहीतर मग माझ्या पुढच्या लिस्टला नीट हात घालताच नसता आला .. मग म्हणून नुस्तच पिट्टु बॅगा घेऊन हा किल्ला उडवून यायचय म्हणजे वझ्याला कहार सोबत नसणार... आधीचा केलेला अभ्यास म्हणजे थोडफार महत्वाच 'शेफ्टी गियर' लागणारच ... कारण त्या तिथल्या त्या नेढ्यात म्हणजे भगदाडात चढायला 'दोर बीर descender स्क्रूगेट' असल जरा हार्डवेअर साहित्य लागणार .... उगाच त्या शिवाय फुकाट आपण आपलाच तमाशा करुन घ्यायला नको उगाच ... असल्या विचारांची गोळाबेरीज चालु असतांना ईतक्यात जाताना हायवेला रस्त्यावर मन्याला काही हॉटेलची रांग दिस्ताच म्हणाला "दादा , मी काय म्हणतो जरा थोड फार खाल्ल अस्त ना आपण लगेच किल्ला चढून उतरलो असतो" मी पण आप्ली मंडळाची गणित जास्ती बिघ्डायला नको म्हणून त्याच्याकड़े वाकड्या तोंडाने बघत फक्त 'बर' म्हणालो.

११.३० होत चाललेत आणि उन तापयला चालु झालेल ... गाडीने रस्त्याच्या बाजुने असणारी काही शेत ओलांडत जाताना 'रात्रीच्या मुक्कामच' काय हे कोड डोक्यातच सोडवत असतानाच एक शेत जमीनीला लागून असलेला छोटा डॅम नजरेस पडला.. आणि मग काय "सोय झाली भावा" अस अचानकच ओरडलो आणि गाडी लगेच बाजूला दाबली... मन्याला त्याच्या पडलेल्या भूकेपायी गाडीतच बसवला आणि राक्याला म्हटलो "चल रे जरा टोपी घालून..." एका हॉटेलच्या मागन दोन - चार शेताची बांध पाल्थे घालत ५ - १० मिनिट पुढे गेल्यावर डॅमच्या पाण्याच्या कडेला लागुनच नुकत्च नांगरणी केलेली मोकळी शेतजमीन आणि त्या पाण्यात आपल प्रतिबिंब उमटवत उभा ठाकलेला समोरच असलेला तो लांबसडक पट्ट्याचा तो मोहनदर किल्ला आणि त्याच्या डाव्या बाजुस एक डोंगर सोडून आमची पाण्यासाठी वणवण केलेल्या कालच्या अहिवंतगडाचा भाग पन दिसत होता... आणि तीच ती खिंड असावी...
मी म्हणालो "ए रॉनी ... आज जर आपली दुसरीकड कुठ नीट सोय नाही झाली तर हीच आजची आपली मुक्कामाची आणि ह्या ट्रेकवर किमान उद्यातरी आंगभरून आंघोळ होण्यासाठी ही बेश्ट जागा...." माझ् बोलन व्हायच्या आधीच राकेश बोलला "आयला भावडया म्हण्जे एक शाम लेक्साईड टेंट मे कॅंपिंग असल तर अपनेको चिकान का बेत होना रे........ "
मी पण आपल "हौ रे भाऊ.... हौ ...." अस म्हणत आम्ही दोघेपण हसत गाडी कडे गेलो नि मन्याला बनलेला पिलान सांगितला तर त्याला त्याच्या सध्याच्या भुकेपुढ त्याला काहीच न ऐकून घेता मोबाइल मधून तोंड काढून आम्हाला नूस्त बोल्ला की "रात्रीच रात्रीलाच बघु यार पण आता काहीतरी खायला चला..." त्याच तोंड बघून मला हैद्राबादी बिर्यानी पिक्चर मधल्या त्या मिशिवाल्या 'किरात' च्या एका डायलॉगची आठवण आली अन तो जसा पोटावर हात फिरवत इस्माईल भाईला "पूरा फिरा के आये उस्ताद, ये चौड़े चौड़े गल्ल्या... वो बड़े बड़े गल्ल्या.... उस्ताद, भूक लग री उस्ताद...भूक लग री.. कुछ तो खिलादो यारो." मन्याच्या तोंडावर त्या 'किरात'ची दूसरी कॉपीच लटकली ... आम्ही दोघांनी फक्त माना हलवल्या आणि मी गाडीला स्टार्टर मारला.
रस्त्यावर 'नांदूरी' या तालुक्याच्या गावातुन मोहनदरी कड़े जाणाऱ्या फाट्याला एका हॉटेलला थांबलो.... या फाट्याच्या जवळच मारुती मंदिराच्या कट्ट्यावर एका मोठ्या पिंपळाच्या झाडाखाली काहीशा वीरगळी नजरेस पडल्या.... युद्धात धारातीर्थ पडणाऱ्या वीरांच्या स्मृतीसाठी कोरल्या जाणाऱ्या दगडी स्तंभ म्हणजे वीरगळ.
आम्ही सप्तशृंगीगडाच्या जवळच हायवेवर असल्याने तिथही देवीभक्तांची अशी ज़रा जास्तीची वर्द्ळ दिसत होती... धार्मिक ठिकाण असल्याने मला तर काही खायला 'चांगल' मिळेल या बाबत शंका वाटल्याने मन्याला जे काही खायचे ते टेष्ट करुनच आम्ही दोघांनी नंतर तसच मागवल... आम्ही १ - १ मिसळ पाव आणि सकाळपासून मिस झालेला चहा मारुन थेट मोहनदरी किल्ल्याकडे रवाना झालो ... आता १ वाजायला लागलाय .... वाढत उन चांगलीच किक देणार हे नक्की असल्याने १ किलोबर काकड्या आणि चाट मसाला सोबत ठेवलेल्याच होत्या ...

मोहनदर किल्ल्याच नेढ कित्तीतरी लांबुन पण आमच लक्ष वढुन घेत होत...
खरतर अशी नेढ म्हणजे सह्याद्रीच्या कातळाची निर्मीती होतांना काही ठीसुळ भागही तयार झालेले अन पुढे चालून काळाच्या ओघात उन-वारा-पाऊस सोसत अशा भागांची पड़झड़- झीज होत गेली आणि कातळकडयाला आरपार झालेली ती भोक च होय.. मोहनदर च्या पायथ्याशी गावात त्या दुमजली आश्रमशाळेच्या इमारतीजवळ पोहोचलो... आणि पुढची चौकशी चालु केली ती आम्हाला हटकलेल्या तिथल्या त्या शिपायासोबतच .....

गडावर जाणार्या सगळ्या वाटा ह्याच आश्रमशाळेपासून जातात एवढीच माहीती होती पण आम्ही त्यातील कोणती वाट निवडायची ते आम्ही आमच्याकडे नेहमी प्रमाणे वेळ जास्ती नसल्याने डायरेक्ट नेढ्याच्या जवळ्ची पण ज़रा जास्त चढणाची वाट निवडली... थोडाफार कोरडा खाऊ, काकडी, एनर्जल पावडर आणि २- २ पाण्याच्या बाटल्या आणि safety साठीच रोप...ईतर जे काही तिथ लागणारच अस हार्डवेअर साहित्य ब्यागात घेउन भर दुपारच्या दीड २ च्या उन्हात आमच आम्हीच चढायला सुरवात केली... आजपण ईथ सोबत वाटाड्या वाट दाखवायला कुणीच तयार नव्हत यायला... बदनसीबी हो आजपण आमची ( ईथच तर धोक्याची घंटा वाजली पण ऐकू कोणाला येणार... सब गोलमाल है भाई सब गोलमाल ..... नाय आलं हो ऐकू ... ) ..... असो ... शोधु आपली वाट आपणच पुढे अस म्हणत आम्ही आमचा गाडा त्या तापलेल्या झळाळीत.. वरच्या सांगितलेल्या दिशेन हाकायला सुरवात केली...
वर जस जस जाऊ तस तस आता खालच्या पट्ट्यातली दाट हिरवी झाडी संपली आणि गारवा पुरवणारी सावली पण गेली... खरतर उन्हाच्या वेळी मला चढ़ाई नको होती पण लय मुंगळे आमच्यात.... घ्या अजुन असा सुनवत सूर्य पन अजुन तळपत होता..... उन्हात मला आजुन अस किती करपून सोडणार... बालपणापासूनच माझ्यावर तसा अंधार पडलेला त्यात आता हा उरलेला दिवस संपुन आंधार पडायच्या आत खाली यायच टार्गेट म्हणून आता फक्त मोहनदर च्या त्या नेढ्यावर घुसायच वेध लागलेल....
भराभर चढ़न्याच्या हेक्यात दुपारच्या उन्हात आता अंगातुन निघणाऱ्या घामासोबत आमच्या छातीतून शीट्ट्या वाजायला लागल्या.... चढता चढता पाण्याचे ब्रेक घेत मी मन्या ला आणि राक्या ला या नेढ्या बाबतीतची तिथली लोकल आख्यायिका सांगु लागलो ...

"सप्तशृंगी देवी जेव्हा महीषासुर राक्षसाचा वध करण्यास खाली अवतरलेली तेव्हा भयभीत झालेला राक्षस ईतक्या वेगाने आकाशाला भिडायला गेला की जाताना या किल्ल्याच्या भिंतीच्या दगडातून आर पार गेला तेव्हा पासून हे अस भगदाड़ म्हणजे 'नेढ' तयार झालेलं..... आणि काही कुणी अस मानतात की त्या कातळभिंतच्या पलीकड महिषासुर लपलेला मग देवीनेच लाथ मारुन तयार झालेल्या खिडकीतून त्याला ओढून काढला... अस अजुन काय च्या कई...... "
मी पण तिथच ऐकलेल्या वाचलेल्या त्या दंतकथा बाता काही त्या दोघांच्या पचनी पडल्याच नाही अस वाटल , तोच वर नेढ्याकडे पाहील तर आमची वाट जरा जास्तीच चुकल्यासारखी वाटली कारण आम्ही आता संपूर्ण किल्याच्या डाव्या बाजुच्या पश्चिम टोकाच्या दिशेकडे आलेलो तर ते नेढ राहीलेल मधल्या पट्ट्यात वरच्या बाजुला....च्यायला ईतकी मळलेली वाट जशी सांगितली तशी फॉलो करत निघालेलो तरी पण अस कस होतय ??... मग नेहमीप्रमाणे आमचा 'हुडक्या' मन्या ला पाठीमागे परत पाठवून आपला कुठला टर्न चुकला बिकला की कायते बघायला हाकलला....
खरतर कालच्या किल्ल्याच्या झालेल्या फरफेटेमूळ आमच सगळ्यांचच चालताना वाटेकड लक्ष होत पण साला घोळ कुठ होतोय ते कळाना .... त्या आश्रमा पासुन सरळ अशी तिरकी वाट ही नेढ्यापर्यंत जात होती हे ही त्या शिपायाने त्याच्या काठीने दाखवल असताना आता पुन्हा आता आजपण आमची जाम वाट लागणार की काय ... अस वाटायला लागल... आमच्या आत्ता च्या लोकेशननुसार मधल्या भागात नेढ्याच्या जवळ जायला काही ठिकाणी अवघड असा कातळ टप्प्यांचा ओवरहॅंग आमच्या बाजूने सरळसरळ दिसत होता आणी त्यात गचपान पण माजलेल होत म्हणून क्लाईंब हार्डच होता हेपण नक्की... स्पोर्टी मन्या आता कसा बसा अतोटी कसोटी करत माकड़उड़या मारत वर वर नेढ्याच्या दिशेन वर वर घुसताना दिस्ला... राक्या कड़ बघितल तर त्यानी पन माझ्या न विचारलेल्या प्रश्नाला नुस्तच वाकून मानेनी नाई नाई नाय ... अस हलवत डोळे चोळत माझ्याकड़ बघत र्हायला.... मग मन्याला मुद्दाम परत आमच्या कड माघारी बोलावला आणि आहे तीच बोड़की वाट फॉलो करून जाऊ.. मग लांबुन का होईना ह्या वाटेने डाव्या टोकाकडून नेढ्यावर नेईल अस वाटवुन घेतल... अन त्यात अंधार पडण्याच टेंशन तर होतच की म्हणून मग आजतरी निवडलेल्या मुक्कामाला उजेडातच पोहोचायच असा ठरल होतच ..... जरा आज नॉन व्हेज बेतातल सुस्तीतल relaxation ठरवलेल... दुसर काय ....
डाव्या बाजूने अजुन वर चढ़त राहीलो .... आम्ही आता बरोबर किल्ल्याच्या पश्चिम टोकाला पोहोचलो तसा एका छोट्या खिंडीतून डोक वर काढताच गड माथ्यावर आमचा प्रवेश झाला खर.. पण नेढ्यात जायला ती वाट नव्ह्तीच मुळी हे पुढ सरकल्या शिवाय का ते आम्हाला कळणार होत ... सुर्य तसाही अजुन चिक्कार सोबतीला होताच कारण ४ ची तर फक्त वेळ झालेली असल ...
वरच्या माथ्यावरून आता समोर एका बाजुला दरीतून डायरेक्ट ढगात घुसू पाहणारे सप्तशृंगी गड , मार्कण्ड्या ,जावळ्या , रवळ्या , धोडपगड, कन्हेरगड , इखारा, कांचना असा नाशकातल्या सातमाळ डोंगररांगेतील एकापेक्षा एक वरचढ सुंदर दुर्ग ते .... आम्ही मागच्या वर्षी याच किल्ल्यांची ( कन्हेरगड कांचना वेळेअभावी सुटलेले ) पायपीट केलेली हीच गड डोंगररांग रांग उठून दिसत होती...
तर दुसऱ्या बाजूला विस्तीर्ण खालपर्यंत जंगल आणि मग त्या पलीकडे हिरवीगार शेतं.... चणकापूर धरण , चिंचोरी गाव परिसर नजरेत भरत होतं!
तर दुसऱ्या बाजूला विस्तीर्ण खालपर्यंत जंगल आणि मग त्या पलीकडे हिरवीगार शेतं.... चणकापूर धरण , चिंचोरी गाव परिसर नजरेत भरत होतं!
खरंतर मोहनदर किल्ल्याचे सारे अवशेष हे त्या नेढ्याच्या उज्व्या बाजुस वरच्या माथ्यावर आहेत अशी माहीती घेतलेली होती आणि आम्ही अजुनही डाव्या भागातल्या पश्चिम टोकाच्या माथ्यावर जिथ ते मोकळ पठार होत तिथेच होतो... आता तिघांनी नेढ्याच्या दिशेने चालायला सुरवात केली.... वाट आता अरुंद आणि निमुळती होत चाललेली... वरतुन उजव्या बाजूला मोहनदरी गाव आणि आश्रमशाळेची ती ईमारत स्पष्ट दिसत होती... माझ्या समोरुन मन्या भराभरा पावल टाकीत पुढे गेला आणि नेढ्याच्या जवळच अगदी वर जाऊन एके ठिकाणी थबकला... त्या ठिकाणापासून वरतूनच त्या कातळभिंतीच्या रांगेतल्या बऱ्याचशा दगडांची पडझड झालेली दिसत होती आणि आता आमच्या दोन्ही बाजुला खोल दरी.... आ वासुन ठाकलेली ती ...
मन्या बोलला पुढे जायचय का ? पण आम्ही दोघांनी ठळक पणे 'नाही' म्हणून मान हलवली कारण धोका असा शिवुन गेला की कदाचित आता त्या ठिसूळ झालेल्या दगडावरून खाली Descend करत जाण्याच्या प्रयत्नात त्या नेढ्याच्या वरची शिल्लक राहिलेली दगड पण ढासळली तर !! छे... भाऊ सर सलामत तो किल्ले पचास..... त्यापेक्षा आता 'दिल्या घरी सुखी रहा आणि गेल्या जागी समाधानी व्हा...'. आमच्या कडचा दोर साधारण १५० फुट भर.... पण खाली उतरायला किमान २५० फुट तरी पायजेल होता मग तसा कायतरी rappeling चा विचार केलाच असता....
ईथ समोर ईतका डायरेक्ट drop होता की आपण जिथे आपटणार ती जागा पण नीट दिसत नव्ह्ती ... मी माझ्या गड-किल्ल्यांच्या भटकंतीत अशा प्रकारच्या या स्पॉटवर म्हणजे एका ईतक्या भल्या मोठ्या नैसर्गिक तयार झालेल्या भगदाडा च्यावर एकदा जुन्नारजवळच्या 'हटकेश्वर' ट्रेक ला गेलेलो आठवल ... त्या किल्ल्याच्या अर्धगोलाकार C टाईप उंचा भिंतीच्या मध्यावरील अरुंद स्पॉट वरुन चारी बाजुला दिसणारा तो नजारा ... जाम भारीवाल फीलिंग येत होत तिथ ....
आम्हाला आता त्या दिवशी माझ्या भटकंतीतल्या कुठेतरी वाचलेल्या आणि अतिपरिचित नसलेल्या किल्ल्यांमधल्या आणखी एका स्वप्नाची पुर्ती करणारी अशी ती विलक्षण अनुभुती पदरी येत होती .... आणि मी तसा स्तब्ध होउ लागलो.... तिथला थरार..... त्या नेढ्याची खरी भव्यतेचा अंदाज आता येऊ लागलेला ..... आम्ही तिघे पण तिथेच त्या नेढ्यावरच्या काळ्या खडकावर बसलो अन घशाची पडलेली कोरड विझवण्यासाठी पाण्याऐवजी तिखट-मीठ लावून काकडी ब्रेक मारायचा मंडळाचा निर्णय ...
पुढे तर जायची रिस्क न घेता त्या ठिकाणी थोड़ वर सरकुन त्या तिरकस दगडाच्या सपाटीवर थोडी पाठ टेकवायच्या माझ्या विचारास आता मी सुद्धा फाटा देउ शकत नव्हतो...

आमच्या खाली असलेल्या अवाढव्य खिडकीसारख्या त्या नेढ्यातुन ईतका असंख्य वारा घुसून बाहेरून दुसऱ्या बाजुला निघतानाचा एक विशिष्ट असा आवाज कानात सतत उमटून आम्हाला पुन्हा पुन्हा त्याच पोकळीत नेउन सोडत होता... तिथला SsSs घोंगता वारा,,,,,त्या स्पॉट चा थरार अनुभवत आणि निळ्याशार आकाशात उमटलेल्या काही विमानाच्या धुरांच्या रेषेकडे बघत आम्ही तिघे निपचीत पडलेलो असताना आमची सगळी झालेली उन्हातली वणवण नि अंगात भिणलेला थकवा आता आमच्यातुन गायब होत खडकात विरत चाललेला होता ... दुसऱ्या बाजूला ढगातल्या दिनकराने सुध्दा एकीकडे झुकता कल घेऊन आमच्या वरची बिंबवलेली नजर हटवून आजचा कारभार आटोपून अस्ताला निघायच्या तयारीत होता .....
२५ - ३० मिनिटे निवांत पडलो असल नेहमीप्रमाणे.. मग नंतर उठून मोहनदर किल्ल्याच्या त्या अर्ध्या चंद्रकोरी सारख्या कातळभिंतीच, मग कुठे त्या अवाढव्य खिडकीतुन पलीकड उमटणार्या सांजेच्या कवडशाच... आजूबाजूचा सातमाळ डोंगररांग - धरण - गड - शेत अस जे जमेल ते आमच्या फोटोंच्या चौकटीत आमच्यासह बद्ध करुन निघायच ठरवल... कारण आजतरी आम्हाला उजेडातच मुक्कामाच्या जागी पोहोचून नॉनवेज चा बेत उरकायचा होता.....
म्हणून मग आता गड़ उतरायला जास्ती वेळ लागणार नव्हताच ना .... .भराभर गड उतरायला घेतला आणि आल्या पावलांनी खिंडीतली घसरडी वाट पकडून वळणवळण घेत अंधाराने आम्हाला गाठायच्या आधी धापा टाकायला चालु केली....... लवकरच आश्रम शाळेजवळ पोहोचलो एकदाच..... थोड़ा क्रीम रोल भत्ता मारला मग
पटापट ब्यागा डिकित कोम्बल्या आणि गाडीतून परत नांदरी रोडला रवाना .. ....
पटापट ब्यागा डिकित कोम्बल्या आणि गाडीतून परत नांदरी रोडला रवाना .. ....
नांदुरी फाट्यावरच्या अनेक चिकन दुकानांमधल्या रांगा पाहुन राका ने हेरलेल्या एका शॉप मधुन चिकन पॅक करुन त्या छोट्या धरणाकडचा रस्ता पकडला तोवर अंधार झालेलाच थोडाफार आणि मग तिथंच एका हॉटेल मालकाशी बातचीत करून तिथेच गाडी लावुन आमची पलटन camping च सार सामान पाठीवर लादुन शेताच्या बाजुची ठरलेली वाट उपसत... जमेल ती पडलेली लाकड गोळा करत... निवडलेल्या जागेची नीट पाहणी करुन टेंट मारला एकदाचा, अन बॅगा टाकल्या आत.
मी चुल मांडुन पेटवायच घेतल तोच राका बोलला आज झणझणीत बनवायच राव ... मी म्हणालो थोडा वेळ लागेल बनायला पण मस्त लसलशित अशी एक बंगाली चिकन रेसिपी माहितीये मला तस करु मग आज ... चला आता आजचीपण शेफगिरी माझ्याकड आल्यावर थोडेफार हुकुमशाहीची मजा घेऊन ताट- भांडी पातेली धुवून घेतली दोघांकडून...
बेत तर आमचा झगासच होताच आणि आता कालच्या पेक्षा आजच्या झालेल्या दमणुकीचा... गडाचा.. पायथ्याच्या गावाचा... त्या आश्रमशाळेचा.. अशावर चर्चासत्र होउ घातले... वाढत्या थंडी बरोबर चुलीच्या धगाजवळची ती उब आता आम्हाला अजुन घट्टपणे तीच्यासोबत बांधु लागलेली आणि त्यात आमच्या त्या बंगाली चिकन चा सुटलेला सुवास सगळीकडं दरवळू लागलेला ...
मन्या बोलला दादा आता जाम भुक लागलीये झालय का बग की झालाय का ते ... राक्या बोलला 'सब्रर का फल मीठा होना रे ...' आमच्या समोरच त्या मोहनदर किल्ल्याचा सबंध कातळकडा दुरवर पसरलेला दिसत होताच आणि त्याही अंधारात आमच्या गप्पा टप्पांसोबत ... निळ्याशार पाण्यात .. चांदण्याच्या प्रकाशात .. आम्ही ते मोहनदारीच नेढ शोधु लागलेलो ...

मस्त पैकी तिघांनी चिकन-भात आणि राहिलेली घरची भाकरी रश्साबरोबर कुसकरेली हादडताना घरची आठवण काढत संपवल.. "लयी म्हणजे लयी भारी झालेलय राव चिकन ... माझ्या फार मोजक्याच ट्रेकवर ईतक स्वादिष्ट जेवलोय ... - ईति राक्या... पोटावर हात फिरवत "अन्न दाता सुखीभव" आणि असलच काहितरी बरळत हे दोघे पण थोडाफार फेरेफटका मारून टेंटमध्ये शिरले... नॉनव्हेज जेवणामुळ मग टेंट बाहेर येउन सगळी ईतर खातरजमाकरुनच मी स्वतः झोपायला घेतल...
धरणाच्या पाण्यावरची हवा आता चांगलीच थंडावली होती... आम्हाला ती हवा जेवण जास्ती झाल्याने जास्तीच गारगार जाणवत होत ...
मी विचारात पडलेलो की अजुन २ दिवस शिल्लक आहेत आता अजुन कुठ कुठ भटकायच ... ?
आम्ही अजूनही सप्तश्रुंगी परिसरात असल्याने माझ्या स्मरणपोटलीत 'बागलाण प्रांत' होताच आणि तिथल्या भागातली अप्रतिम अशी काही दुर्गरत्न अनुभवायचीच यंदा तरी असा किडा सुरु होताच कारण असं की बागलाणातला एका ही किल्ल्यावर कधी फिरकलेलो नव्हतो आणि त्यात परत परत कोण कशाला इकडं तरफडणारं ...?

परत मोबाईल मध्ये मी maps मध्ये आमच्या लोकेशन च्या जवळपासच सगळ धुंडाळत बसलो थोडावेळ... मग म्ह्टल ... बघु उद्याच उद्या .... आजचा तर दिवस मस्त गेलाय म्हणून सुखावलो तोच राक्या कड एक नजर पडताच तो माझ्याकडच बघत होता.... तो डोळे वटारुन नुस्ता म्हणाला .... "त्या मोबाईल ची स्क्रीनलाईट बंद करुन गप झोपतोस का आता ?" मी तसाच चुपचाप स्लीपिंग बॅग मध्ये डोक दडवुन घुसून झोपी गेलो .... पण उद्याचा विचार पक्का .. माझा एकट्याचाच त्यावर शिक्का.... की आपण एकदाही न भटकलेल्या त्या 'बागलाण प्रांतावर' थोडीतरी घुसखोरी करायचीच उद्याला ....
क्रमशः
या आधीच्या भागाची लिंक इथे देत आहे : नाशिक भटकंती भाग ३: अहिवंतगड
तुमच्या प्रतिकिया /सूचना जरूर कळवा ...
तुमच्या प्रतिकिया /सूचना जरूर कळवा ...