शनिवार ८ जून, २०१९
अजून एक टप्पा पुढं गेल्यावर एक पठार लागलं. तिथून किती वर आलो त्याचा अंदाज येत होता. पलीकडे दरी होती तिथं जाऊन आम्ही "बाबा डोंगर कशाचा बनतो", पासून "तिकडं डोंगरात मगरी सारखा काही तरी दिसतंय
-रा.जा.
इयर एन्ड ट्रेक नंतर एक पण ट्रेक झाला नाही, शुक्रवारी संध्याकाळी सहज मनात विचार आला, पाऊस चालू व्हायच्या आत सिंहगडाला तरी जाऊन येऊ. आधी एकटच जायचा प्लॅन होता पण सहज अवनिची मजा करावी म्हणून तिला विचारलं "येणार का ट्रेकिंगला, आई नाही येणार मी एकटाच जाणार आहे?".
"मी येणारे बाबा, पन... तिथं किडे आणि साप असतात...". सुरुवातिलाच असा प्रश्न विचारल्यावर मला वाटलं होतं आता हि कल्टी मारणार, एकटं जावं... "अवनि, मी आहे आपन जाऊ बरोबर, मी हात धरतो तुझा"... आणि मग थोडा विचार करून म्हणाली ठीके बाबा जाऊ... मला हे अपेक्षित नव्हतं आणि सकाळी उठून काय होतंय ते पन सांगता येणार नव्हतं.. तरी पण त्यातल्या त्यात समाधान...
एरवी झोपण्याआधी टाइम पास बडबड करणारे आम्ही.. सकाळी कधी उठायचं आणि काय कपडे, शूज, ... खायला काय... वगैरे वगैरे चर्चा करत झोपी गेलो...
ठरल्याप्रमाणे ६ वाजता कोणीच उठलो नाही... मला वाटलं आता प्लॅन गंडणार.. आपण आपलं निघावं.. मी आवरून घेतलं.. बायकोला बहुतेक अंदाज असावा कारण अवनि तशी तिला सोडून कुठं जात नाही.. त्यामुळं ती निवांत होती..
पण थोड्याच वेळात अवनि मॅडम उठल्या आणि तयारीला लागल्या... मी मनातल्या मनात म्हणालो " आहे वाटतं अजून डोक्यात हिच्या". पटापट बॅग भरली आणि दोघं पन तयार झालो. बायकोच्या चेहऱ्यावर आता आपल्याला निवांत राहता येणार ह्याचा आनंद आणि हे दोघं कसे करणार ट्रेक याची काळजी असले दोन्ही भाव मला दिसायला लागले... त्यात कुठली भावना जास्त स्ट्रॉंग होती माहित नाही पण त्यात सतराशे साठ सूचना दिल्या गेल्या आणि "हो...ओSSS ..." म्हणून आम्ही दोघं घरातून बाहेर पडलो... साधारण ८ वाजले होते ..
कात्रज वरून सिंहगड तास लांब नाही पण जसा उशीर होणार तसं ऊन वाढणार त्यामुळं निघाल्यानंतर कुठं काही थांबलो नाही... ड्रायविंग सीटच्या बाजूची सीट पूर्ण रिक्लाईन करून निवांत राहिलेली झोप पूर्ण करत अवनि अधूनमधून पोचलो का बाबा विचारत होती.. मधेच एकदा खडकवासल्याच्या धरणाचं पानी बघून पाण्यात जायचंय म्हणून मागं लागली.. येताना जाऊ सांगून... कसं बसं निघालो पुढं...
गडाच्या पायथ्याला पोचलो ९ वाजता. जसा एसी मधून बाहेर पडलो उन्हाचा तडाका बेक्कार जाणवायला लागला. आता अशा उन्हात हि कशी तग धरणार असं मला वाटायला लागलं... म्हणून अवनि करायचा का ट्रेक चालू म्हणालो आणि "बाबा मी कधीच रेडीये, तुम्ही शूज घाला कि...", एकंदरीत उत्साह अजून कायम आहे याची मला जाणीव झाली.. चला मग मी पटापट शूज घालून निघालो...
शनिवार असल्यानं येनारी जानारी लोकं बऱ्यापैकी होती.. सुरुवातीचा तसा सपाट रस्ता बघून, "बाबा किल्ला कुठंय ", मग पुढं एका वळणावर तिला गड दाखवला.. पुणे दरवाजाच्या बाजूनी बसवलेली रेलिंग दिसत होती.. पुढं निघालो.. मोठा दगड दिसला कि त्याच्यावरूनच जायचं.. घसरतंय असं दिसलं कि बाबा भीती वाटतीये .. असं म्हणत आम्ही पहिल्या टप्प्यात आलो... त्याच्या पुढं "बाबा असा कसा ओ ट्रेक.. मी तर पळू पन शकते एवढा कमी चढ कसा काय असतो किल्ल्याला"... "वरती बघ कि...अवनि.. ", "हा.."
असं म्हणत पहिला टप्पा आला... मला अंदाज नव्हता हिला किती दम लागलाय किंवा तहान लागली, तरी एक पाणी ब्रेक घेतला.. थोडं पुढं गेलो तर एक कॉलेजच्या मुलामुलींचा ग्रुप दमून बसला होता... पुढं लगेच चढ होता. मला वाटलं जरा दम खावा तर अवनि म्हणाली "कुठंय मोठा चढ?" मग निघालो पुढं... तिची तशी कंमेंट ऐकून ती कॉलेजची पोरं पन हसून उठायला लागली.. आम्ही एक एक टेकड चढत तर कधी साधा रस्ता पकडत पुढं निघालो... लांबून एक दुकानाचं शेड दिसत होतो तिथं गेल्यावर थांबू असं आम्ही ठरवलं...

शेड जवळ आलो आता घशाला कोरड पडली होती.. मस्त सावलीची जागा होती.. अवनि म्हणाली बाबा संत्री काढा.. मग मस्त रसरशीत संत्री आम्ही दोघांनी संपवली.. उन्हाचा पारा चांगलाच चढला होता.. तरी अधून मधून येणारी वाऱ्याची झुळूक हायसं करत होती... माझा जरा जास्त थांबायचा विचार होता.. तर अवनि म्हणाली "बाबा सगळे जातील आपल्या पुढं..चला लवकर..." मला हसू येत होतं पन मी निघालो...
"अशा भूगोलापासून जीवशास्त्रापर्यंत गप्पा हाणून पुढं निघालो..." मधेच वरची रेलिंग नाही तो रेल्वे ट्रॅक आहे असं मला समाजवण्यात आलं आणि मान्य करून आम्ही पुढं निघालो.. मधेच रस्त्यात लांब एखादा पक्षी दिसायचा आणि बाबा पक्षी असं दाखवून त्या रखरखीत उन्हात खडकाळ आणि बॅकग्राऊंड मधे तो काळा पांढरा पक्षी शोधण्यात माझ्या नाकी नऊ यायचे.
आता गडाची चढण अंगावर येत होती, वर चढताना अंगावर लोड येत होता... येताना जाताना जाणारी लोकं कौतुकानी बघत होती त्यामुळं अवनिचा उत्साह अजून कायम होता. एक कॉलेजच्या वयाची मुलगी गड उतरताना रडकुंडीला आलेली दिसली... बाप जरा मिल्ट्री स्टाईल ... तिला कडक बनवायच्या मागं होता.. अजिबात मदत न करता सर सर पुढं चालत होता.. "बाबा जरा हेल्प करा ना", असं ती मुलगी बोलली आणि अवनि तिला क्रॉस झाली.. आता हि काही तरी डायलॉग मारणार.. "बाबा, एवढी मोठी मुलगी तरी तिला कसं उतरायला येत नायओ?" हे सगळं त्या दोघांना सहज ऐकायला गेलं असनार, त्यामुळं मी मागं बघण्याची आपली काय हिम्मत नाय झाली..."चल अवनि ते बघ तिथं दुकान दिसतंय म्हणून विषय बदलला"..
पुढं दुकानवाल्यानी ताक, लिंबू सरबत घेणार का विचारला तेंव्हा अवनि बरणीतल्या लॉलीपॉप कडं एकटक बघत होती.. मग मी ऑरेंज आणि स्ट्रॉबेरी फ्लेवर चे दोन लॉलीपॉप घेऊन तिला दिले.. आता लॉलीपॉप खात हि कशी चढणार आणि शेवटी उचलून घ्या म्हणणार.. म्हणालो वर गेलो कि खा.. ठीके बाबा म्हणत तिनी तो माझ्या बागेत टाकला...
आता मग माझ्या हाताचा घेत ती चढायला लागली. आणि उजवा पाय दुखतोय म्हणाली.. ते साहजिक होतं कारण प्रत्येकवेळी चढताना ती तोच पाय वर टाकत होती.. "अवनि थोडं दुखलं कि स्ट्रॉंग होतं माहितीयेका नंतर.." पुढं निघालो तर अवनि आता डावा पाय पुढं टाकत होती.. "बाबा आता ह्याला पन स्ट्रॉंग बनवते". पोरं जरा .. नाय जास्तच पुढची निघत्यात आई बापाच्या..
"बाबा किती वर आहे अजून?", "जवळच आलोय रेलिंग बघ".. एक तर ऊन जास्त लागत होतं, त्यात चढण जास्त होती.. "अवनि लॉलीपॉप देऊ का".. "नको बाबा वर गेल्यावरच खाणार"... "अवनि आईला विडिओ कॉल लावायचा का?".. "नको नको आईला वर गेल्यावरच करू कि सरप्राईझ"... पुढं चालत आम्ही जवळपास वरच पोचलो.. मग शेवटची चढण चढायच्या आत एका दुकानात सावलीत बसलो.. दुपारची वेळ होती नेहमी पेक्षा गर्दी कमी होती त्यामुळं दुकानदार निवांत झोपला होता.. बाजूलाच सावलीत मी आणि अवनि बसलो.. दम खाऊन झाला तेंव्हा अवनिनी दुकानात नजर टाकली.. आणि म्हणाली "बाबा, असं दुकानात कोन झोपतं का ओ"... मी काय उत्तर देनार.. मला वाटलं आता हा इथून उठतोय आपल्याला.. दुकानदारानी तोंडावरचा रुमाल बाजूला करून एकदा बघितलं आनी परत झोपला.. आणि आम्ही हसायला लागलो...
दहा पंधरा मिनटं आराम केला.. आणि शेवटचा टप्पा पार केला... वर जाऊन भिंतीवर जाऊन हवा खात बसलो.
"बाबाSSS लॉलीपॉपSSS.."... सुप्रियाला विडिओ कॉल केला... स्टॉल वॉर लॉलीपॉप कैरी, शेंगा खात आम्ही थोडा वेळ बसलो..
आता जवळपास ११-११.३० झाले होते.. माझा विचार आता सरळ गाडी पकडून पायथ्याला जायचा होता.. सहज अवनिला विचारलं कि गड बघायचा का? तर चक्क हो म्हणाली... चला कमीत कमी नरवीर तानाजी मालुसरेंची समाधी बघावी आणि देवटाक्यातलं पाणी प्याव.. पुणे दरवाजा, तोफखाना पार करत पुढं निघालो..
मला बर्फाचा गोळा जरा रिस्की वाटतो.. आणि आता हिनी तोच मागितला.. मग म्हणलो जाऊदे च्यायला एवढी चालून आली कि पोरगी, घेऊन दिला आणि देव टाक्याकडे निघालो..
"या साहेब बसायला सावलीत जागाये, पिठलं भाकरी, कांदा-भजी, ताक..", "येताना नक्की या" असे आवाज ऐकत देव टाक्याकडं पोचलो..
रायगड वरून आलेला एक ग्रुप पाण्याच्या बाटल्या भरत होता.. त्यांनी आम्हाला पण दोन बाटल्या भरून दिल्या.. आम्ही येताना पिलेलं पाणी उन्हामुळं गरम झालं होतं. पानी पिल्या-पिल्या "बाबा पाणी किती थंडये..., वाव.." पानी पिल्याचा आनंद अवनिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.. त्या ग्रुप कडून एक भगवा झेंडा घेऊन आम्हीदोनचार फोटो काढले आणि निघालो... "
परतताना तानाजी मालुसरेंच्या समाधीला नमस्कार केला आणि तिथल्या मावळ्यांच्या पुतळ्यांसमोर फोटो काढले.. त्यांनी कोणती शस्त्रं हातात घेतलीयेत वगैरे वगैरे गप्पा करत आम्ही परत निघालो..
सुप्रियाचे चार पाच मिसकॉल येऊन गेले होते.. पुढं जाऊन करू कॉल असं म्हणत घोड्याच्या पागे जवळ आलो तर जायचं तिकडं म्हणून अवनिनी हट्ट केला..
आता मी तिला किल्ला दाखवला का तिनी मला हा प्रश्न मला पडायला लागला.. पागा बघून, पायऱ्या उतरत आम्ही निघालो.. आता पायऱ्या उतरताना मला कंटाळा आला होता, पन हिला प्रत्येक पायरीवरून उतरताना जम्प करायची होती... १०-१५ मिनिटं चालत वडाप करणाऱ्या गाडयांच्या पार्किंग मध्ये पोचलो.. गाडी खचा-खच भरल्याशिवाय काय निघणार नव्हता मी ड्रायव्हरच्या बाजूची सीट पकडली.. खिडकीच्या दारात कोपर ठेऊन अवनिला मांडीवर घेऊन डोळे मिटून बसलो.. मागं गुरं भरली असती तरी मला आता फरक पडणार नव्हता... थोड्या वेळानी गाडी स्टार्ट झाली.. आणि मग वळणावर कधी सिंहगडाचं, कधी खडकवासला धरणाचं दर्शन घेत गड उतरलो.. अवनि मस्तपैकी माझ्या हातावर डोकं टेकवून झोपी गेली होती... अजून सुप्रियाला फोन करायचा बाकी होता... पुढचा ट्रेक कुठला करायचा.. हिचा उत्साह असाच राहणार का?... हो .. कदाचित.. माहित नाही. पण आजचा अनुभव अद्वितीय होता... आपल्याला आवडणारी गोष्ट आपल्या लेकीला पन आवडावी आणि मग एकत्र त्याचा आनंद घेता यावा.. भावड्या अजून काय रे पाहिजे... सहजच मनात विचार आला ...

वाटेत एका दुकानातून अवनिनी टेलिस्कोप मागितला माझ्यातला बाप आज उदार होता. सगळ्यात महाग घेतला, घरी एक असताताना. "बाबा तो जुना तुम्ही घ्या", "बर...". मग जवळंच्या हॉटेलवर पिठलं-भाकरी, कांदा-भजीआणि ताक पिऊन भूक शांत केली..
सुप्रियाचे चार पाच मिसकॉल येऊन गेले होते.. पुढं जाऊन करू कॉल असं म्हणत घोड्याच्या पागे जवळ आलो तर जायचं तिकडं म्हणून अवनिनी हट्ट केला..
आता मी तिला किल्ला दाखवला का तिनी मला हा प्रश्न मला पडायला लागला.. पागा बघून, पायऱ्या उतरत आम्ही निघालो.. आता पायऱ्या उतरताना मला कंटाळा आला होता, पन हिला प्रत्येक पायरीवरून उतरताना जम्प करायची होती... १०-१५ मिनिटं चालत वडाप करणाऱ्या गाडयांच्या पार्किंग मध्ये पोचलो.. गाडी खचा-खच भरल्याशिवाय काय निघणार नव्हता मी ड्रायव्हरच्या बाजूची सीट पकडली.. खिडकीच्या दारात कोपर ठेऊन अवनिला मांडीवर घेऊन डोळे मिटून बसलो.. मागं गुरं भरली असती तरी मला आता फरक पडणार नव्हता... थोड्या वेळानी गाडी स्टार्ट झाली.. आणि मग वळणावर कधी सिंहगडाचं, कधी खडकवासला धरणाचं दर्शन घेत गड उतरलो.. अवनि मस्तपैकी माझ्या हातावर डोकं टेकवून झोपी गेली होती... अजून सुप्रियाला फोन करायचा बाकी होता... पुढचा ट्रेक कुठला करायचा.. हिचा उत्साह असाच राहणार का?... हो .. कदाचित.. माहित नाही. पण आजचा अनुभव अद्वितीय होता... आपल्याला आवडणारी गोष्ट आपल्या लेकीला पन आवडावी आणि मग एकत्र त्याचा आनंद घेता यावा.. भावड्या अजून काय रे पाहिजे... सहजच मनात विचार आला ...
वर्षे जरी सोबती, नसतीलहि नशीबी,
क्षण हे असे आम्हा दे, जगणे हो बेहिशेबी...