१४ नोव्हेंबर २०१८
अचला गड बघून आलो... सुरुवात तर मस्त झाली ट्रेकची... आता चलो अहिवंत... बुंगाSSSSSट... दुपारचे साडेतीनचार वाजलेत. उजेडात अर्धा तरी किल्ला चढून जायला पाहिजे तरच मुक्काम, भत्ता नीट, नायतर वाट लागणार. "माल्या भावड्या, ऱ्हा उभा आक्षीलेटर वर!"
आमच्या माहितीप्रमाणे अहिवंतगडावर जायच्या दोन वाटा. एक वाट म्हणजे अचलाची डोंगररांग तशीच बुध्याच्या बाजूनी पुढं जात अहिवंत गडाकडे पोचती त्या रांगेनी चालत जाणं, जाई पर्यंत दुसरा दिवस नक्की उजाडनार.. दुसरी वाट दरेगावातून, तिनी गेलो आणि गाईड बरोबर घेतला तर तासादीडतासात गडावर जाऊ शकतो... म्हुनून त्याच वाटेनी वर जायचं ठरलं.
अचला बरोबर टवाल्या, बुध्याचा डोंगर आणि कोल्हेर अशी डोंगररांग उन्हात मस्त चमकत होती. त्यांना रामराम करताना, मला उगीचंच, गावाकडं गेल्यावर भावकीला चुकवून लवकर निघायला जावं आणि निघताना सगळी चुकवलेली मंडळी एकदम दारातून आपल्याकडं बघताना दिसावी असलं फीलिंग येत होतं. पण त्याला काय पर्याय नव्हता.... भेटू परत.. रामराम... म्हणून आम्ही पुढं निघालो.
लवकर एखादा प्रॉपर माहिती देणारा मिळावा राव, उगंच भरकटत बसायला नको... असं म्हणालो आणि तिथून पुढं पाचच मिन्टात एक छोटंसं गाव लागलं. तिथं अहिवंत गडाचा रस्ता विचारून आम्ही पुढं निघालो...
बास, रस्ता कळलाय.. आता टाइम पास नको .. गाडी परत बुंगSSS .. नॉन-स्टॉप दरेगाव..
दरेगावात पोचताच समोरच अहिवंत गड दिसत होता... पसारा चांगलाच दिसतोय.. पन जायचा रस्ता..? तासा-दीड तासात अंधार पडणार आपलं आपन शोधू पन राजे जर चुकलो तर?... गडावर जाणं सोडा.. पण अंधारात फरफट .नको भाऊ.. कोन दिसतंय का बघा... गाईड शोधा? ... असं म्हणायला आणि लगेचं "मुछोकि नयी हरियाली, बॉडी इष्टील वाली, जैसे अमावास का चांद, माने धोबिको दिन भरका काम, कान मे बाली, या बालिमे कान, बत्तीसी के कलर के आगे झक मारे सोनेकी दुकान.." डिट्टो फॅन्ड्रीतला झब्या ... आता ह्याला रस्ता विचारावा का. पण काय ऑपशन तर नाय ... चला विचारून बघू... "इतुन गडावर कसं जायचं?"...एवढंच विचारलं तर पुढं पाच मिनटं... डायलॉग, ऍक्शन, इमोशन अँड ड्रॅमा, नॉन स्टॉप... "माल्या च्यायला पाच-दहा ची टाकलेला लावटी पंटर नायनाबे? जायचा पुढचा प्लॅन बाराच्या भावात.. शॉट नको"... आता माल्याच्या अंगात जग्गा जासूस शिरला.. "भाऊ तू कधी गेलता, कसा गेलता, अजून कोन गाईड मिळलं का जायला?..." मग शेवटी, त्याच्याकडून गडावर जायला बारीतून(खिंडीतून) सोपी वाट आणि तिथून अर्धा-एक तासात सहज गडावर जाऊ शकतो हि कामाची माहिती एकदाची मिळावली... तरी पन जरा डाऊट होता म्हनुन परत एक जनाला रस्ता विचारून त्या पोरानी सांगितलेली माहिती कन्फर्म केली आणि निघालो तडक खिंडीकडं..
वर पाणी आहे हे ब्लॉग वर वाचून माहित होतं पण कुणीतरी नुकतंच जाऊन आलेलं सांगून गेल्यानं आम्हाला तसं रिलॅक्स वाटत होतं. मग बॅगा पटापट भरल्या.. प्रत्येकी दोन बाटल्या पाणी, जेवनाच सामान. माल्या म्हणाला टेन्ट पण घेऊ वर मुक्काम उघड्यावर करावा लागणारे. खरं तर मगाशी चौकशी केलेल्या त्या मंडळींमध्ये, एक पोरगी साडी घालून पायात साध्या चपलांवर वरून जाऊन आली होती हे आम्हाला दिसलं होतं. त्यामुळं वाट काय जास्त अवघड नसणार हे नक्कि होतं.. काय प्रॉब्लेम नाय टेन्ट घ्यायला.. असं म्हणत टेन्ट बिनविरोध मंडळाच्या सामानात सामील झाला.. नायतर कुनी सांगतंय म्हनून एक्सट्रा पाण्याची बाटलीपन कोन घेतंय...
सूर्य काय अजून मावळतीला लागलानव्हता, बॅगा चढवल्या खांद्यावर.. ५.३० वाजले होते फक्त.. उजेडात जाऊ रे सपसप... चला असं म्हणत आम्ही चढाईला सुरुवात केली.
आम्ही पुढं सरकतोय... सूर्य खाली येतोय.. हसतोय का? का हसतोय??... पुढं कायवाढून ठेवलंय? बघू पुढंचं पुढं... पाण्याचा एखादा घोट घेत सूर्यास्त बघत आम्ही पुढं सरकत होतो. दरवाजाचा तो टप्पा पार केला पुढं परत पठारावर आलो. अंधार पडत आला होता. आमच्याकडचं निम्म पाणी संपलं होतं, त्यामुळं पाणी आता आणीबाणीचा विषयच झाल्ता. मग बॅगेतून टॉर्च बाहेर काढल्या आणि तिघं एक बाजू पकडू आणि शोधू पाणी म्हणून शोधाशोध चालू झाली. मला जाम कंटाळा आल्ता... किल्ले फिरताना काय नाय वाटत पन असली शोधाशोध जीवावर येती. पन पाणी मिळालं तर म्हणजे जेवण आणि मुक्काम झकास होईल ह्या एका आशेपायी मी लढत होतो. माल्याला असल्या वातावरणात त्याच्या सुप्तगुणांना वाव मिळत असल्यानी चेव चढतो.. मन्याला कशाचा काही फरक पडत नसतो..
पुढं थोडं लांब किल्याच्या मधोमध टेकडी दिसत होती.. आम्ही तिच्या डाव्या बाजूला होतो. एकदा वाटलं असायचं पाणी पलीकडं आणि आपण शोधत बसायचो अलीकडं... च्यायला.. पण कोन जायचं पलीकडं चढून.. मरूदे इकडं टेकडीच्या अलीकडं शोधू मिळालं तर नशीब. मी डावीकडं, मन्या मधी आणि माल्या उजवीकडं असा शोध चालू . पार अर्धा तास झाला तंगड तोड करत होतो पन पाणी काय दिसलं नाय. तेवढ्यात मन्याचा "तळं दिसतय या लवकर" असा आवाज आला. जवळ गेलो तर च्यामारी गुरांनी पाणी पार गढूळ करून टाकल होतं. शोधमोहीम परत चालू .. चालत चालत पार त्या टेकडीच्या बाजूलाच आलो. टेकडीवर मधे एक झेंडा पन दिसत होता.. आता उगंचच वाटत होतं वर गेलो तर पाणी दिसल. त्या आशेनी तिघंपन गेलो टेकडी चढून... एवढा आटापिटा करून चढलो एकदाची टेकडी खरी पण कसलं काय, ना टेकडी वर ना टेकडी पलीकडं पाणी... आसलं तरी आता काय दिसतंय.. काळा कुट्ट अंधार.. त्यात मगाशी बाजूचं एवढं मोठं तळं आम्हाला लवकर दिसलं नाही तर पाण्याचा बारीक झरा कधी दिसणार...
सकाळी ७ वाजता जाग आली, समोर मस्त नजारा दिसत होता. गुहेबाहेर काल रात्री आम्हाला फक्त काळोख दिसला होता. आता मात्र दरीचा पूर्ण विस्तार आणि खोली आम्हाला टेन्टमधून बसल्या बसल्या दिसत होती. एकदम व्हॅली व्हिव. बाकीची गॅंग पण आता उठली होती. मग एक छोटा फोटो सेशन झाला...
पुढं परत पठार आणि कोरडं टाकं लागलं, काल रात्री दिसलेली गुरं काही आजूबाजूला दिसत नव्हती. पोटं हलकी झाल्यानी पोटाचा गजर वाजायला लागला. मग तिथंच बॅगा खाली ठेवल्या. रात्री जेवण बनवताना लक्षात ठेवून एक्सट्रा अंडी उकडलेली. ब्रेड, अंडी, सॉस आणि चीझ असं मस्त सँडविच खाऊन पोटाला तात्पुरता आधार दिला.
खिंडीकडं जाणाऱ्या नागमोडी रस्त्यावर मधूनच सप्तशृंगीची डोंगररांग मस्त दर्शन देऊन जात होती. सप्तशृंगी गडावर पायी आणि गाड्या घेऊन जाणाऱ्या भक्तांच्या रांगापण दिसत होत्या. आम्हाला आता खिंडीचे आणि नंतर मुक्कामाचे वेध लागले होते.. साधारण १५-२० मिंटानंतर खिंडीत येऊन पोचलो... खिंडीचा हा रस्ता दरेगाव आणि बेलवाडी हि गडाच्या पायथ्याची गावं जोडतो, त्यामुळं अधून मधून ये-जा करनाऱ्या एकदोन गाड्या दिसत होत्या.. आपली गाडी कुठं लावायची कारण मुक्कामी वर जाणार म्हणजे खिंडीत गाडी लावणं जरा रिस्की वाटत होतं.. पण काय ऑपशन नव्हता.. तिथंच एक गाडी लावली होती तिच्या मागं गाडी दिली लावून बघू व्हईल ते व्हईल...
जायचा रस्ता नीट माहित नव्हता पण पटापट आवरायचं म्हनुन आधी बॅगा भरायला घेतल्या... वरून कोन तरी येतंय असं दिसत होतं.. चिल्ली पिल्ली होती. आम्हाला वाटलं येतील गड दाखवायला पण घरी सांगितलं नाही म्हणून त्यांनी काय इंटरेस्ट दाखवला नाही. जाऊदे गडावर जायचा रस्ता तरी कळाला.... थोड्यावेळानी परत डोंगरावरून दोन-तीन डोकी खाली येताना दिसली. खाली आल्यावर जरा विचारपूस केल्यावर ते आधिपन दोन-तीनदा येऊन गेले होते, वर भरपूर पाणीये, एक जिवंत झरा पने डोंगराच्याकडला दरीच्या बाजूला, गड लई मोठाय, मंदिर हाये पन झोपायची सोय नई... अशी माहिती कळाली. एवढं सांगून ते गाडी घेऊन आपल्या मार्गाने निघून गेले.
जायचा रस्ता नीट माहित नव्हता पण पटापट आवरायचं म्हनुन आधी बॅगा भरायला घेतल्या... वरून कोन तरी येतंय असं दिसत होतं.. चिल्ली पिल्ली होती. आम्हाला वाटलं येतील गड दाखवायला पण घरी सांगितलं नाही म्हणून त्यांनी काय इंटरेस्ट दाखवला नाही. जाऊदे गडावर जायचा रस्ता तरी कळाला.... थोड्यावेळानी परत डोंगरावरून दोन-तीन डोकी खाली येताना दिसली. खाली आल्यावर जरा विचारपूस केल्यावर ते आधिपन दोन-तीनदा येऊन गेले होते, वर भरपूर पाणीये, एक जिवंत झरा पने डोंगराच्याकडला दरीच्या बाजूला, गड लई मोठाय, मंदिर हाये पन झोपायची सोय नई... अशी माहिती कळाली. एवढं सांगून ते गाडी घेऊन आपल्या मार्गाने निघून गेले.
वर पाणी आहे हे ब्लॉग वर वाचून माहित होतं पण कुणीतरी नुकतंच जाऊन आलेलं सांगून गेल्यानं आम्हाला तसं रिलॅक्स वाटत होतं. मग बॅगा पटापट भरल्या.. प्रत्येकी दोन बाटल्या पाणी, जेवनाच सामान. माल्या म्हणाला टेन्ट पण घेऊ वर मुक्काम उघड्यावर करावा लागणारे. खरं तर मगाशी चौकशी केलेल्या त्या मंडळींमध्ये, एक पोरगी साडी घालून पायात साध्या चपलांवर वरून जाऊन आली होती हे आम्हाला दिसलं होतं. त्यामुळं वाट काय जास्त अवघड नसणार हे नक्कि होतं.. काय प्रॉब्लेम नाय टेन्ट घ्यायला.. असं म्हणत टेन्ट बिनविरोध मंडळाच्या सामानात सामील झाला.. नायतर कुनी सांगतंय म्हनून एक्सट्रा पाण्याची बाटलीपन कोन घेतंय...
सूर्य काय अजून मावळतीला लागलानव्हता, बॅगा चढवल्या खांद्यावर.. ५.३० वाजले होते फक्त.. उजेडात जाऊ रे सपसप... चला असं म्हणत आम्ही चढाईला सुरुवात केली.
अर्धा पाऊणतास चढाई नंतर जवळ जवळ माथ्यावरच आलो.. थोडं अंतर अजून.. मधी थोड्या पायऱ्या लागल्या, आता थोड्या वेळात अंधार होणार त्यामुळं लवकर मुक्कामाची जागा सापडावी हेच सगळ्यांना वाटत होतं. तेवढ्यात एक गुहा दिसली.. इथं पाणी असलं तर मुक्कामाला मजा यील.. जवळ गेलो तर गुरांनी शेणाचा सडाच टाकलेला... जवळ पाण्याचं पण काय नाव नाय. नकोच हितं चला वरतीच बघू ... असं म्हणून पुढं निघालो...
पाच मिनटं चाललो तर गडाच्या माथ्यावर पोचलो.. च्यायला आलो पण वरती SSS .. आता काय मुक्कामाची जागा शोधा, लाकडं शोधा.. पाणी काय असल जवळच कुठंतरी.. बरं झालं अजून सूर्यास्त नाय झाला.. गडावरती काय हायनाय ते दिसतंय थोडं तरी... अशी चर्चा करत पुढं निघालो. लांबून एक पठार, भरपूर गुरं, खाली जमीनीचा बराचसा भाग काळा खडकाळ, मधोमध टाकं असल्यासारखं दिसत होतं. गुरं आहेत टाकं आहे पाणी असनार, चला जरा झपझप. अर्रर्रर्र... जवळ गेलो तर टाकं कोरडं निघालं. म्हणजे पाण्यासाठी अजून फिरावं लागणार. सात वाजले होते. पुढं निघालो. पुढं दगडांची पडकी जोती, आधी बऱ्यापैकी बांधकाम असनारा, पायऱ्या, दरवाजा, कोठी,असा भाग लागला. एकंदरीत बांधकाम बघता किल्ल्यावर येण्याचा राजमार्ग असनार असं वाटत होत. नंतर ब्लॉग मध्ये पण तसा उल्लेख सापडला.
आम्ही पुढं सरकतोय... सूर्य खाली येतोय.. हसतोय का? का हसतोय??... पुढं कायवाढून ठेवलंय? बघू पुढंचं पुढं... पाण्याचा एखादा घोट घेत सूर्यास्त बघत आम्ही पुढं सरकत होतो. दरवाजाचा तो टप्पा पार केला पुढं परत पठारावर आलो. अंधार पडत आला होता. आमच्याकडचं निम्म पाणी संपलं होतं, त्यामुळं पाणी आता आणीबाणीचा विषयच झाल्ता. मग बॅगेतून टॉर्च बाहेर काढल्या आणि तिघं एक बाजू पकडू आणि शोधू पाणी म्हणून शोधाशोध चालू झाली. मला जाम कंटाळा आल्ता... किल्ले फिरताना काय नाय वाटत पन असली शोधाशोध जीवावर येती. पन पाणी मिळालं तर म्हणजे जेवण आणि मुक्काम झकास होईल ह्या एका आशेपायी मी लढत होतो. माल्याला असल्या वातावरणात त्याच्या सुप्तगुणांना वाव मिळत असल्यानी चेव चढतो.. मन्याला कशाचा काही फरक पडत नसतो..
पुढं थोडं लांब किल्याच्या मधोमध टेकडी दिसत होती.. आम्ही तिच्या डाव्या बाजूला होतो. एकदा वाटलं असायचं पाणी पलीकडं आणि आपण शोधत बसायचो अलीकडं... च्यायला.. पण कोन जायचं पलीकडं चढून.. मरूदे इकडं टेकडीच्या अलीकडं शोधू मिळालं तर नशीब. मी डावीकडं, मन्या मधी आणि माल्या उजवीकडं असा शोध चालू . पार अर्धा तास झाला तंगड तोड करत होतो पन पाणी काय दिसलं नाय. तेवढ्यात मन्याचा "तळं दिसतय या लवकर" असा आवाज आला. जवळ गेलो तर च्यामारी गुरांनी पाणी पार गढूळ करून टाकल होतं. शोधमोहीम परत चालू .. चालत चालत पार त्या टेकडीच्या बाजूलाच आलो. टेकडीवर मधे एक झेंडा पन दिसत होता.. आता उगंचच वाटत होतं वर गेलो तर पाणी दिसल. त्या आशेनी तिघंपन गेलो टेकडी चढून... एवढा आटापिटा करून चढलो एकदाची टेकडी खरी पण कसलं काय, ना टेकडी वर ना टेकडी पलीकडं पाणी... आसलं तरी आता काय दिसतंय.. काळा कुट्ट अंधार.. त्यात मगाशी बाजूचं एवढं मोठं तळं आम्हाला लवकर दिसलं नाही तर पाण्याचा बारीक झरा कधी दिसणार...
८ वाजले, आपण मेजर गंडलोय असं मला वाटायला लागलं. मग ज्या बाजूनी टेकडी चढलो त्याच बाजूने टेकडी उतरलो. मला कडकडून भूक लागली होती, डोकंपन चालत नव्हतं. "माल्या, पाणी मिळलं तवा मिळलं बेकार भूक लागली मला आता डोकं आऊट झालय खाऊ कायतरी" मग त्या टेकडीच्या पायथ्याशी बसून आमचा एक भेळीचा ब्रेक झाला. आता कुठं बरं वाटायला लागलं. पाण्याची लेवल अजून खाली आली.
"मन्या ए बैलाSSS , पाळंदेंच्या पुस्तकातला गडाच्या माहितीचा फोटो घे म्हन्लो होता ना? दहा वेळा सांगूनपन तू घेतला नाय!!!"... मन्याला शिवी घालत बसल्या बसल्या माल्यानि ब्लॉगवरून किल्ल्याची माहिती परत परत वाचायला सुरुवात केली. मग ट्यूबलाइट पेटली. ब्लॉगमध्ये सांगितलेल्या महत्वाच्या खुणांपैकी एकपण खूण आम्हाला आत्तापर्यंत दिसली नाही.. काय काय लिहलंय माल्या... "सप्तशृंगी-मारुती मंदिर, गुहा आणि झरा... ". साधारण १० मिनिटं किल्ल्याच्या दुसऱ्या टोकाकडं चालत गेलो, एक मंदिर दिसलं. खरं तर टेकडीवर चढून ती बाजू मी मगाशी बघितली होती पण अंधारात काहीच नाही दिसलं . मंदिराजवळ गेलो. मंदिर ओपन दिसतंय झोपू नाही शकणार इथं. सप्तशृंगी आणि मारुतीच्या मूर्ती दिसल्या. आणि बाजूलाच जवळच अजून एक तळं दिसतय, पण तेपन कोरडंच होतं..

मंदिर सापडलं, वाचलेल्या माहितीमधली पहिली खूण मिळाली... आता मात्र आमचा उत्साह वाढला. पुढं मंदिराकडून टेकडी उजवीकडं आणि दरी डावीकडं ठेऊन चालत जायचं होतं, मग सुरुवातीला दरीच्या बाजूला गुहा आणि नंतर पुढं पाणी दिसणार अशा खुणा ब्लॉगमध्ये सांगितल्या होत्या. त्याप्रमानं आम्ही गुहा कुठे दिसतीये का ते शोधत होतो. पण गुहा सापडण्याचं काय नाव नाय... मन्या तर पार लांब तिकडं गडाच्या टोकावर जाऊन आला... पण काय फायदा नाय झाला.. आता अंधारात गुहेच्या तोंडापाशी गेल्याशिवाय गुहा असली तरी आम्हाला दिसनार का हा पन प्रश्नचं होता म्हणा. मधूनच आपण चुकीच्या दिशेने शोध घेतोय का असले डाऊट माझ्या डोक्यात यायला लागले. जवळपास अर्धा तास भटकल्यानंतर माल्या एका दरीच्या साईड ला काही तरी दिसतंय म्हणाला.. मग जरा खाली उतरून गेलो तर गुहा. चांगली प्रशस्त आणि स्वच्छ.. गुहे समोर जागा पण ऐसपैस... झोपण्याची सोय मस्त... कडक... गुहेत बाजूला एक टाकं पन दिसलं, इथं पावसाळ्यात पानी असन्याची शक्यता आहे, पन आता मात्र अजिबात पानी नव्हतं. गुहेतून बॅगा घेऊन परत पाणी शोधायला वर आलो, आणि पुढं चालायला लागलो.
ज्या टेकडीला आम्हाला उजवीकडं ठेवायचे होतं तिची एक बाजू संपली आणि आम्ही तिला वळसा घालत होतो... ब्लॉग प्रमानं पाणी आम्हाला आतापर्यंत सापडायला पाहिजे होतं. च्यायला पाणी असलं तरी सापडायचं का आता, काळ्याकुट्ट अंधारात बॅगा पाठीवर टाकून आमची शोध मोहीम अखंड चालूच. माल्या जरा पुढं गेला. साधारण १० मिनिटे चालल्यावर... "झरा सापडला रे..." असा त्यानी आवाज दिला. आम्ही मंदिरापासून ज्या जागेवरून टेकडीला धरून पाणी शोधायला सुरुवात केली त्याच्या तिरक्याविरुद्ध बाजूला आम्हाला पाण्याचा झरा सापडला...
मग आम्ही कुठं माती खाल्ली? एकतर दरेगावातून वर आलो असतो तर पाणी लगेच मिळालं असतं.. पण वेळ नव्हता आणि गाईड पण.. मग झब्याकडून नवी सोपी वाट कळाली.. म्हणून आम्ही चढलो दुसऱ्या बाजूनी.. त्या बाजूनी गेल्यावर किल्ल्याचा सगळा पसारा पालथा घालून दरेगावाकडून आलेल्या टोकाला जाण्यात काय पॉईंट नव्हता.. तेवढा वेळ पण नव्हता ... आता दुसरा पाण्याचा पॉईंट म्हणजे गडाच्या मध्यावर असलेल्या टेकडी जवळचा बारीक झरा .. आमची सगळी भिस्त त्याच्यावरच होती... पुस्तकात मॅप होता, पन टेन्ट आरामात वागवणाऱ्या मन्याला फोटोचं वजन जास्त झालं मोबाईल खेळण्याच्या नादात तो फोटो काढायला विसरला... अशा परिस्थितीत उजेड असता तर एखाद्या वेळेस झरा लवकर सापडला असता पण आम्हाला पार अंधार झाल्ता टेकडी पर्यंत पोचे पर्यंत.. त्यात ब्लॉग वाचून पाणी दरीच्या आमच्या कडच्या बाजूला दिसणार आहे असं आम्हाला वाटत होतं... तो अंदाज पण चुकीचा झाला.. त्यामुळं अजून घोळ झाला, गडाचा पसारा मोठा होता त्यामुळं आधी दरीच्या बाजूनी लांब लांब गुहा आणि नंतर पाणी आम्ही शोधत बसलो..
बॅगा खाली टाकल्या आजू-बाजूला बॅटरी मारून सेफ आहे अशी खात्री करून घेतली. हातानी गटागटा पाणी पिऊन घेतलं. झऱ्याचं थंडगार, नितळ पाणी जरा जास्तच गोड लागत होतं. पाणी सापडलं खरं, पण गडाच्या माथ्यावर लवकर पोचून सुद्धा तब्बल २ तास पायपीट झाली आणि पुढं जेवण बनवा, खा आणि टेन्ट लावून झोपा....

रात्रीचे ९.१५ झाले होते. पाच दहा मिनिटाच्या अघोषित विश्रांतीनंतर, थंडगार पाणी पिऊन, झालेली सगळी पायपीट आम्ही विसरून गेलो. माल्यानि स्वयंपाकासाठी दगडं बघून चूल लावायला सुरुवात केली. मन्या आणि मी लाकडं गोळा करायला लागलो. मसाले, अंडी , तांदूळ पटापट बागेतून बाहेर काढली... पण रेसिपि कुणाला माहित? माल्याला मोबाईलवर ढाबा स्टाईल अंडा-करी व्हिडिओ सापडला.. मग त्यातल्या अनुनासिक का काय ते.. तसल्या (आमच्या भाषेत घशात शेंबूड अडकल्यासारख्या) आवाजात रेसिपि ऐकत अंडा करीचा बनवायचा निर्णय मंडळानी घेतला...अंडाकरी झाली.. अंडा करीला राईसशिवाय काय मजा म्हणून दोघांना कन्व्हिन्स करून मी पातेल्यात भात पण लावून दिला. भूकतर एवढी लागली होती कि पोटातले कावळे घशात आणि तिथून डोळ्यात येऊन "झालं का रे जेवण तयार???" असं विचारून जातायत असं मला बऱ्याच वेळा वाटलं... मग तासाभरात घरून आणलेल्या भाकऱ्या, अंडा करी आणि भात असा जबरी मेनू तयार झाला. त्या सगळ्यावर ताव मारत, जोडीला कांदा तोंडी लावत आम्ही मस्त जेवण केलं. जरा जरी आडवे झालो असतो तर जागेवरच झोपलो असतो म्हणून जास्त सुस्ती यायच्या आत पटापट भांडी पण धुऊन टाकली.
लयी बेकार झोप येत होती राव, कधी एकदा झोपतोय असं झालतं. जास्त कष्ट नको म्हणून जिथं चूल आहे त्याजवळच झोपावं असा प्लॅन जेवताना ठरला होता, पण सामान तिथं ठेवायला जायच्या आधी सहज चेक करावं म्हनुन बघितलं तर बाजूलाच दगडाच्या फटीत सापाची कात दिसली...
मग त्याजागेवर मुक्कामाचा प्लॅन लगेच कॅन्सल करून टेन्ट लावण्यासाठी वरच्या बाजूला जवळच एक सपाट जागा शोधली. आता पटकन टेन्ट लावून आडवं पडायचं बास... पण नाही वारं एवढं भयंकर होतं कि लावलेला टेंट उडून जाईल.. आत झोपलो तर.. फाटून जाईल नायतर काड्या तरी नक्कीच तुटून जातील अशी लक्षणं... परत बॅगा खांद्यावर गुहेतच मुक्काम.. तंबू काढून बॅगा खांद्यावर.. मिरवणुकीवरून परत आलेल्या मंडळाच्यासारखी गत झालती.. त्या मेंगाळलेल्या अवस्थेत मंडळ गुहेकडे निघालं... सुदैवाने येताना गुहा सापडली आणि पाण्यापासून ती जवळच होती त्यामुळं तसं काय टेन्शन नव्हतं...
गुहेत पोचल्यावर पटापट बॅटऱ्या मारून आजू बाजूला सगळं ओके आहे ना ते पहिलं बघितलं. तशी खात्री झाली मग त्यातल्यात्यात जास्तीत जास्त सपाट जागा बघून आम्ही तंबू लावला... सगळं सामान तंबूत ठेवलं, पायातले बूट काढून ठेवले. पाठ टेकवण्याचा स्वर्गीय आनंद घेत, न घोरण्याची आणि सकाळी लवकर उठण्याची एकमेकांना आठवण करून देत जमिनीवर अंग टाकून दिलं. सकाळी शिव्या नको पडायला म्हणून पडल्या पडल्या गजर बंद करायला मोबाईल हातात घेतला, रात्रीचे १२ वाजले होते. गडावर येताना
आम्हाला नक्कीच हसत असणारा तो सूर्य पृथ्वीच्या कुण्या कोपऱ्यात पुढच्या शिफ्टला रुजू झालाअसनार... आमची पन एकदाची सुट्टी झाली.. डोळे मिटले... प्रतिहास्य दिलं आनी निद्रिस्त झालो ...
१५ नोव्हेंबर २०१८
१५ नोव्हेंबर २०१८
सकाळी ७ वाजता जाग आली, समोर मस्त नजारा दिसत होता. गुहेबाहेर काल रात्री आम्हाला फक्त काळोख दिसला होता. आता मात्र दरीचा पूर्ण विस्तार आणि खोली आम्हाला टेन्टमधून बसल्या बसल्या दिसत होती. एकदम व्हॅली व्हिव. बाकीची गॅंग पण आता उठली होती. मग एक छोटा फोटो सेशन झाला...
टेन्ट आवरला.. बॅगा घेऊन गुहेच्या बाजूनी चढून परत माथ्यावर आलो. पाण्याच्या स्पॉटला परत एकदा जाऊन पोटं हलकी केली. पोटभर पाणी पिऊन बाटल्या टॉप अप केल्या आणि खिंडीच्या दिशेनं चालायला लागलो. सकाळचे ८-९ वाजले असतील. मस्त कोवळं ऊन पडलं होतं. झपझप पावलं टाकत आम्ही निघालो. तेवढ्यात पुढं मला काहीतरी हालचाल दिसली. "साप.. सापSSS.. " आम्ही तिघं पण तिकडं पळालो. धामण ... सकाळचं कोवळं ऊन घेत सरसर चालली होती.. आम्ही शक्य तेवढे फोटो काढून घेतले. आमची चाहूल लागल्यावर पटकन ती एका फटीमध्ये घुसली.. आता काय लवकर बाहेर येत नाय. गप काढलेत त्या फोटोंवर समाधान मानून आम्ही लगेच पुढं निघालो...
पुढं परत पठार आणि कोरडं टाकं लागलं, काल रात्री दिसलेली गुरं काही आजूबाजूला दिसत नव्हती. पोटं हलकी झाल्यानी पोटाचा गजर वाजायला लागला. मग तिथंच बॅगा खाली ठेवल्या. रात्री जेवण बनवताना लक्षात ठेवून एक्सट्रा अंडी उकडलेली. ब्रेड, अंडी, सॉस आणि चीझ असं मस्त सँडविच खाऊन पोटाला तात्पुरता आधार दिला.
पुढं अर्धा पाऊण तास चालल्यावर खिंडीत उतरायच्या रस्त्याला लागलो. नंतर पंधरा वीस मिंटात खिंडीत गाडीजवळ पोचलो. सगळं सामान परत गाडीत ठेवलं आणि दरेगावाकडं निघालो.
खिंडउतरून गाडी सप्तशृंगीच्या दिशेनं वळवली.. जवळपास काही चांगलं हॉटेल दिसत नव्हतं म्हणून वनीत जाऊन भत्ता टाकायचं ठरलं. एकंदरीत ह्या भागात भारी भारी किल्ले आहेत. त्यातले मार्कंड्या, रावळ्या-जावळ्या, धोडप ही मोहिम गेल्यावर्षी झाली, मग ह्या मोहिमेतला पुढचा किल्ला कुठला? माल्यांच्या लिस्ट मधला मोहनदरी किल्ला तिथून जवळच होता. किल्ल्याचा फोटो बघितला, नेढं काय भारी दिसत होतं... आयच्या गावात... क्लाSSSसच ...
क्रमश:

किल्ल्याबद्दलची माहिती
पायथ्याचे गाव: दरेगाव, बेलवाडी
जाण्याचे रस्ते: दरेगावातून, दरेगाव आणि बेलवाडीमधल्या खिंडीतून, अचलावरून
पाण्याची सोय: दरेगावातून वर गेल्यावर टाके, किल्ल्याच्या मधोमध टेकडीच्या तळ्याच्या बाजूला झरा
मुक्कामाची सोय: पायथ्याच्या गावात होऊ शकते, किल्ल्यावर सोय नाही
महत्त्वाच्या खुणा: खिंडीतून चढताना माथ्याजवळ पायऱ्या आणि गुहा, पठार , कोरडं टाकं, पायऱ्या, दरवाजा पडलेला भाग, टेकडी, दोन तळी, मंदिर, सप्तशृंगी मारुती मुर्ती, दरीच्या बाजूला गुहा...
जवळपासचे किल्ले/डोंगर:

अचला, मोहनदरी, कोल्हेर